हंसराज अहिर माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पडोली चौक येथे १०१ लिटर दूध वाटप.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- हंसराज अहिर माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून पडोली चौक येथेे १०१ लिटर दूध वाटप तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी ए आघाडीला बहुमत मिळाल्याबद्ल तसेच संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टी ला विधानसभा पोटनिवडणुकीत घवघवीत यश संपादित केल्याबधल भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर च्या वतीने  मा.देवराव भाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा व मा. नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा यांचे प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून, घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला.
यावेळी श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू.मो.सौ. शोबाताई पिदुरकर तालुका अध्यक्ष महिला आघाडी श्री.विजय आग्रे तालुका महाचिव.श्री.अजय चालेकर.श्री.रणजित सोयाम् श्री.विनोद खेवलें श्री.विनोद खडसे.श्री.आशीष वाढई श्री.विजय माशिरकर.सौ.दुर्गा बावणे.सौ.मीनाताई मानुसमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.