🔊 चंद्रपूर जिल्ह्यातील व शहरातील भाजपची सक्रिय कार्यकारणी घोषित.

Bhairav Diwase
🌷भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी (ग्रा) कु. अल्काताई आत्राम व महानगर जिल्हाध्यक्ष पदी सौ. अंजलीताई घोटेकर.

🌷भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी (ग्रा) आशिष भाऊ देवतळे व महानगर जिल्हाध्यक्षपदी विशालदादा निंबाळकर.
Bhairav Diwase. Nov 05, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील व शहरातील भाजपची कार्यकारणी घोषित करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रा) देवराव भोंगळे व भाजपा जिल्हाध्यक्ष (महानगर) डॉ गुलवाडे यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली व त्यामध्ये अनेकांना संधी दिली असून महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी (ग्रा) कु. अल्का आत्राममहानगर जिल्हाध्यक्ष पदी सौ. अंजली घोटेकर यांना संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली.

भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी (ग्रा) आशिष भाऊ देवतळे व महानगर जिल्हाध्यक्षपदी विशालदादा निंबाळकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
 
 मागील अनेक वर्षांपासून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सक्रिय आहे. भाजप पक्षात संघटनात्मक बांधणी मध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. आक्रमक नेतृत्व म्हणून भाजप ची ओळख चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 

चंद्रपूर जिल्‍हा व महानगर भाजपाच्‍या नवनियुक्‍त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. रामदासजी आंबटकर, आ. प्रा. अनिल सोले, आ. ना.गो. गाणार भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, प्रमोद कडू, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजपा मनपा गटनेते वसंत देशमुख आदिंनी अभिनंदन केले.