सुरज बहुरिया युवकावर भर भर चौकात गोळीबार झाला होता.
Bhairav Diwase. Nov 05, 2020
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील जुना बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूर कडून बामणी कडे जात असताना चारचाकी गाडीत बसून जात असताना सुरज बहुरिया नामक युवकावर भर चौकात गोळीबार झाला असल्याची घटना 08 ऑगस्ट 2020 च्या दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ घटात परीसर ताब्यात घेतला असून सुरज बहुरिया वर अंदाजे 5-6 गोळ्या झाडण्यात आल्या असल्याने तात्काळ चंद्रपूर रुग्णालयात पाठविण्यात आले होते परंतु त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
याप्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आले होते मात्र मुख्य आरोपी फरार होता बुधवारला मुख्य आरोपीला आकाश उर्फ चिन्हा याला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे कोळसा आणि दारू चा वादातून ही हत्या करण्यात आली आहे असे बोलले जात आहे बल्लारपुरातील आंबेडकर वार्ड मध्ये सुरज बहुरिया हा रात होता सूरज आणि आरोपी आकाश उर्फ चिन्ह हे दोघेही मित्र होते कोळसा आणि दारू तस्करीतून या दोघांमध्ये वाद सुरू होऊ लागले यास कारणातून आकाश उर्फ चिन्ह याने सुरज बहुरिया ला कायमचे संपवण्याचा कट रचला या कटात आरोपींनी आपल्या सहकारी मित्रांना सामावून घेत सुरज बहुरियाचा हत्याकांड घडवून आणला असे पोलिसांचे म्हणणे आहे घटनेच्या दिवशी सूरज हा बल्लारपूर शहरातील हॉटेल मध्ये गेला होता त्यानंतर आरोपी अमर अंदेवार, अविनाश बोबडे, व बादल हरणे हे तिघेही मोटरसायकलने चक्कर मारून सूरज हॉटेलमध्ये असल्याचे शहानिशा केली होती या तिघांना बघितल्यानंतर सुरजला संशय आला त्यानंतर सूरज हा आपल्या साथीदारांसह हॉटेलमधून बाहेर पडला मित्र अजित त्याच्या चारचाकी वाहनाचा ड्रायव्हरच्या सीटवर बसला यावेळी प्रणय सदन अल्फ्रेड अंथनी हे दोघेही दुचाकीने तिथे आले यावेळेस अल्फ्रेड अंथनी याने आपल्याजवळील पिस्तोलने सुरज वर गोळ्या झाडल्या व सूरज ची हत्या करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले होते या घटनेतील मुख्य आरोपी आकाश उर्फ चिन्ह हा फरार झाला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश उर्फ चिन्हला बुधवारी ताब्यात घेतले त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता दहा झाली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात धनराज कारकाळे अमोल धंदरे गोपाल प्रशांत नागोसे यांच्या पथकाने केली