Top News

राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली तालुका कार्यकारणी गठीत.

ओबीसीची ठाम भूमिका मांडत असल्याबाबद्दल ना.वडेट्टीवार यांचा अभिनंदन ठराव पारित.
Bhairav Diwase. Nov 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- आज दि.1-11-2020 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका सावली ची बैठक सावली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी सावली तालुक्यातील जेष्ठ,युवा,महिला समाज बांधव उपस्थीत होते.


    यावेळी सावली तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कार्यकारणी विस्तार करून नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली.तसेच ओबीसी समाजाची ची प्रमुख भूमिका ना.विजय वडेट्टीवार हे मांडत असल्याने स्थानिक नेत्याचा अभिनंदन करण्याचा ठराव मांडण्याची भूमिका सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार यांनी मनोगत मध्ये मांडली त्यावर सर्व संमतीने पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्याचा ठराव पारित करण्यात आला.

     यावेळी मार्गदर्शक अविनाश पाल,भाऊजी किन्हेकार, कविंद्र रोहनकर, दिनेश मोहूर्ले यांनीही मनोगत व्यक्त करून ओबीसी आंदोलनाची भूमिका विशद केली.

तसेच यावेळी सावली तालुका ची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली त्यात 
अध्यक्ष- कविंद्र रोहणकार,सचिव- भाऊराव कोठारे,संघटक- नितीन गोहणे,दिनकर मोहुर्ले,उपाध्यक्ष- दिलीप पा.ठिकरे, उपाध्यक्ष- अतुल लेनगुरे, उपाध्यक्ष-रमाकांत वाघरे,उपाध्यक्ष- अनिल गुरनुले
 सहसचिव-सुनिल पाल, सहसचिव-सुनिल बोमनवार, सहसचिव- नरेंद्र तांगडे,सहसचिव-गणेश कावळे
 सदस्य- दिवाकर गेडाम,पवन कवठे,किशोर घोटेकर,अर्जुन भोयर,सौ.शोभाताई बाबनवाडे,सौ.उषाताई भोयर,सौ. मनिषाताई जवादे,सौ. निलमताई सुरमवार,सौ.संगिताताई चहांदे,सौ.भावना निकुरे,राजकीय सल्लागार-अविनाश पाल,राजकीय सल्लागार दिनेश पा.चिटनुरवार
 प्रसिद्धी प्रमुख-ईश्वर गंडाटे,ईश्वर मोहुर्ले,मयुर गुरनुले,हरीश जक्कुलवार निवड करण्यात आली. तसेच ओबीसी महासंघ युवा मोर्चा कार्यकारणी निवड करण्यात आली त्यात 
अध्यक्ष- आशिष कार्लेकर,सचिव- विशाल करंडे,उपाध्यक्ष-गिरीश चिमुरकार,उपाध्यक्ष- भोगेश्वर मोहुर्ले,उपाध्यक्ष-जितेश सोनटक्के,सहसचिव- मिथुन बाबनवाडे यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवींद्र रोहनकर यांनी केले.संचालन भाऊराव कोठारे यांनी तर आभार तुलसीदास भुरसे यांनी मानले. आजच्या सभेला सावली तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते.यावेळी कोविड मूळे सोशल डिस्टन चे पालन करण्यात आलेले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने