(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- आज दिनांक 06 /11/2020 रोज शुक्रवार ला मौजा शिवणी येथे सकाळी 7.45 वाजता हरभरा पिक शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले. सदर शेतीशाळे मधे श्री.आर.एस.धुडे कृषी सेवक शिवणी यानी शेतकरी बांधवांना हरभरा पिक व्यवस्थापन, जमिनिची मशागत, बिज प्रक्रिया,रुंद वरंभा सरी पद्धतिने लागवड, पिकावरील किड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
त्यानंतर करडई लागवड करणारे शेतकरी बांधवांनी श्री भाऊजी दादाजी गभने यांचे शेतावर इंडियण इन्स्टिट्यूट ऑफ़ ऑईलसीड रिसर्च, राजेंद्रनगर व कृषी तन्त्रज्ञांन व्यवस्थापन यंत्रणा चंद्रपुर यांनी घेतलेल्या करडई पिक लागवड तन्त्रज्ञांन विषयी ऑनलाईन वेबिनार मधे सहभागी झाले व करडई पिका विषयी माहिती घेतली त्यानंतर सदर शेतिशाळेला श्री.उमाकांत कामडे कृषी मित्र शिवणी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.