(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- काही व्यक्ती मुल नाहीत म्हणुन निराधारीतेच जीवन जगतात.पण काही व्यक्तिंना मुल असुनही निराधार व लाचारिच जीवन जगाव लागत.दोन मुल असुनही गेली कित्येक वर्षे ती ईतरांच्या घरी मागुन आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करते आहे.ती आजी आजही पोटाची खडगी भरण्यासाठी काबाड कष्ट करते. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपलंही काही देणं लागते या भावनेतून गोंडपिपरी यंग ब्रिगेड चे प्रसिद्धी प्रमुख यांनी त्या आजीला साडी,तांदुळ,चप्पल व जीवनावश्यक साहीत्य दिले.या उपक्रमातून समाजातील युवकांनी आपण सुद्या प्रेरणा घ्यावी निराधारांना मदत करावी असे आव्हाहन यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सुरज माडुरवार यांनी केले.गौरव घुबडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.