संदीप पोगला यांचा वाढदिवस वृक्षारोपन व मास्क वाटप करून केला साजरा.

Bhairav Diwase
नेफडो तर्फे पंचेविसवृक्ष तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे मास्क वाटप. 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- प्रत्येक व्यक्ति आपला वाढदिवस वेगवेगळ्या पधतीने साजरा करतात. परंतु कोरोणाच्या संकट काळात ऑक्सिजन आणि मास्क हे अतिशय आवश्यक घटक झाल्याचे दिसून येत आहे. अश्यातच राजुरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे संघटक सचिव तथा नेफडो चे सभासद संदीप पोगला यांच्या वाढदिवसाचे अवचीत्य साधत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने वृक्षारोपन आणि राजुरा शहरात पाचशे मास्क चे वितरण करण्यात आले.
   निर्सगाचा समतोल साधत पर्यावरनाला जपने ,वृक्षसंवर्धन व वृक्षारोपन करने हे आपले कर्तव्य समजून प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आनंदोत्सव हा याप्रकारे साजरा करने आवश्यक असल्याचे संदीप पोगला यांनी यावेळी सांगितले. कोरोणा संकट काळ बघता मास्क वापरणे अतिशय आवश्यक झाले आहे. त्यामुळे पाचशे मास्कचे मोफत वाटप तसेच संत संताजी जगनाडे महाराज समाज सभागृह परिसरात पंचेविस वृक्ष लावण्यात आले.यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, तालुकाध्यक्ष संतोष देरकर, संत जगनाडे महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पुरुषोत्तम गांधारे , जिल्हा संघटक नेफडो विजय जांभूळकर , तालुका संघटक सूनैना तांबेकर , मनोज तेलिवार , आशीष करमनकर , राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका युवक अध्यक्ष आसिफ सय्यद, शहराध्यक्ष तथा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष रखिब शेख, शहराध्यक्ष युवक स्वप्निल बाजुजवार, रोहित दादा पवार विचार मंच तालुकाध्यक्ष सुजित भाऊ कावळे, उपाध्यक्ष राजु ददगाळ, सचिव विजय कुंमरे, महासचिव अंकुश भोंगळे, रोहित दादा पवार विचार मंच चे शहराध्यक्ष ऑस्टिन सावरकर, शहरसंघटक सचिव संदिप भाऊ पोगला, राजुरा तालुका सोशल मीडिया सेल अध्यक्ष जहीर खान, नेफडो चे तालुका सचिव सुजीत पोलेवार आंदिंचि उपस्थित होती.