Top News

चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स पोंभूर्णा द्वारा ‘‘कोविड-19 इंप्रेशन ऑन सोसायटी (कोविड-19 चे समाजावरील पडसाद) या शिर्षकाचे आंतरराष्ट्रीय ओपन अॅक्सेस इ पुस्तकाचे प्रकाशन

कोविड-19 वर पुस्तक प्रकाशित.

Bhairav Diwase. Nov, 10, 2020

पोंभूर्णाः- स्थानिक चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स पोंभूर्णा द्वारा ‘‘कोविड-19 इंप्रेशन ऑन सोसायटी (कोविड-19 चे समाजावरील पडसाद) या शिर्षकाचे आंतरराष्ट्रीय ओपन अॅक्सेस इ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लाॅकडाऊन दरम्यान अनेकांनी लेख व कविता लिहिल्या त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी ‘साहिल्य संकलन उपक्रमाचे आयोजन केले होते. सदर उपक्रम ऑनलाईन असल्यामुळे तसेच त्यात प्राप्त शोधनिबंध, लेख, कविता इत्यादी साहित्य डिजिटल पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलेले असल्यामुळे त्यास कुठलाही खर्च आलेला नाही. शिवाय भारत सरकारच्या राजा राममोहन राॅय नॅशनल एजन्सी फाॅर आय एस बि एन कडून त्यास आंतररष्ट्रीय गुणवत्तेचे पुस्तक क्रमांक प्राप्त झालेला आहे. सदर पुस्तकातील साहित्यात परदेशातील लेखकांसह भारताच्या अनेक राज्यातील व महाराष्ट्रातील 46 लेखक व कविंनी योगदान लिखाण केलेले आहे. हे पुस्तक इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांच्या साहित्याचा समावेश आहे.

   पुस्तकाचे विमोचन प्रसिध्द शैक्षणिक कार्यकर्ते व उद्योजक स्वप्निल दोंतुलवार तथा प्राचार्य व गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की दूर्गम भागातील महाविद्यालयाचा हा स्तूत्य उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून याच कार्यक्रमात ‘मानवाधिकाराची गरज’ या विषयावर प्रकाश टाकतांना प्रमुख पाहूणे डाॅ. पृथ्विराजसिंह राजपूर प्राचार्य इन्नानी महाविद्यालय कारंजा लाड यांनी अन्यायाविरूध्द व मानवाच्या मुलभूत हक्कांचे हनन होत असल्यास प्रतिकार करण्याची गरज व्यक्त केली. सिनेट सदस्य व वक्ते डाॅ. परमानंद बावनकुळे यांनी ‘कोरोना महामारीचा मानवाधिकारावर झालेला परिणाम’ या विषयावर बोलतांना कोरोनाकाळात मानवाने मानवता विसरल्याचे व अनेकांनी मानवतेचे कार्य केल्याचे दाखले दिले व माणूसकीला जपण्याचे आवाहन केले. अध्यक्ष डाॅ. टी. एफ. गुल्हाने यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

       कार्यक्रमास डाॅ. कुंभारे, डाॅ. निखाडे, डाॅ. पठाण, डाॅ. हुंगे या प्राचार्यांसह संपूर्ण देशातील विविध ठिकाणाहून लेखक, कवी, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक तथा प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रस्ताविक मुख्य संपादक तथा सहा. प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी केले तर आभार डाॅ. पूर्णीमा मेश्राम यांनी मानले सुत्रसंचालन प्रा. नितीन उपर्वट यांनी केले. 
सदर पुस्तक वाचनासाठी मोफत असून ते http://chintamani.edu.in/cccp/images/COVID19PUB.pdf या लिंक ला क्लीक करून डाऊनलोड करता येते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने