Top News

वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी मनोज आत्राम यांची निवड.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दि.२८ बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष मनोज आत्राम यांची वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे
         मनोज आत्राम हे विविध सामाजिक संघटनेशी जुळलेले असून त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष बळकटीकरणासाठी जिल्हा कार्यकारिणीने शिफारस केली होती त्यादृष्टीने वंचित बहुनज पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज आत्राम यांनी वंचित बहुजन आघाडी राजुराचे तालुकाध्यक्ष पदी निवड करून कार्यकारणी घोषित केली आहे यामध्ये अध्यक्ष मनोज आत्राम, जनरल सेक्रेटरी बंडू वणकर, अतुल सोयाम, मनोज धोंगडे, रविकिरण बावणे, उपाध्यक्ष रत्नयोग मुन, नंदकिशोर मोहूर्ले, सचिव सुशील मडावी, प्रकाश दुर्वे, नंदकुमार वणकर, सौरभ रामटेके, विरेंद्र पुणेकर, सभासद सदानंद मडावी, प्रवीण भसारकर, मारोती जुलमे, सलागार विजय जुलमे आदींचा समावेश आहे निवडीबद्दल नरेंद्र कुळमेथे, अमोल राऊतसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने