माजी आमदार अँड. संजयभाऊ धोटे यांनी बजावला मतदानाचा हक्‍क.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- महाराष्‍ट्र विधानपरिषदेच्‍या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूकीसाठी मा.अँड. संजय या धोटे माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांनी आज राजुरा तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
      नागपूर विभागातील सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावावा, मतदान हा आपला घटनादत्‍त अधिकार आहे. या अधिकाराचा वापर प्रत्‍येक पदवीधराने प्राधान्‍याने करावा आणि मतदानाचे कर्तव्‍य पार पाडावे असे आवाहन मा.आमदार संजय धोटे यांनी मतदानानंतर केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने