जिल्हा परिषद सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी महापरिनिर्वानदिनी पोंभुर्णा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूष्प अर्पण करुन अभिवादन.

Bhairav Diwase
श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या उपस्थित आज मौजा गंगापूर नवीन, घनोटी तू. डोंगरहळदी तुकुम येथील वयोवृद्ध लोकांना ब्लँकेट वाटप.
Bhairav Diwase.     Dec 06, 2020
नविन फोटो
 ्
पोंभुर्णा:- कोणतीही गोष्टी संघर्षाशिवाय साध्य होत नाही. आपला हक्क अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. समाजातील काही घटकांना अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर डॉ बाबासाहेबांनी संघर्ष केला. त्यांच्या याच संघर्षातून पुढे क्रांती घडली.

           भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनी केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी आज पोंभुर्णा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूष्प अर्पण करुन अभिवादन केले.
        त्यानंतर केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या उपस्थित आज मौजा गंगापूर नवीन, घनोटी तू. डोंगरहळदी तुकुम येथील वयोवृद्ध लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.