(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही येथे दिनांक ०६-१२-२०२० रविवारला ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानव प.पुज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाहीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित विशेष अतिथी गोपीचंद नेरकर (पी एस आय पोलीस स्टेशन सिंदेवाही ) हे होते.तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनासाठी खूप अफ़ार कष्ट,हालअपेष्टा सहन केले. त्यामुळेच आम्ही आज सन्मानाने जगत आहोत. असे ते कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मिथुन मेश्राम, उपाध्यक्ष अमान कुरेशी, भगवंत पोपटे अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाही तथा आक्रोश खोब्रागडे, कुणाल उंदिरवाडे, विरेंद्र का. मेश्राम, प्रशांत गेडाम, भुवन बोरकर, अमोल निनावे हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रास्ताविक भगवंत पोपटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकून केले. कार्यक्रमाचे संचालन कुणाल उंदिरवाडे आणि आभारप्रदर्शन आक्रोश खोब्रागडे यांनी केले.