०३ जानेवारी रोजी चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेहरु युवा केंद्र चंद्रपूर आणि शौर्य क्रीडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३ जानेवारी रोजी चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    कोविड -१९ मुळे राज्यातील रूग्णालयात रक्ताची टंचाई भासत असून महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी युवा वर्गाला स्वयंस्फुर्तिने पुढे येवून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याकरीता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाज सुधारक मंडळ व प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा यांच्या सहकार्याने पार पडत आहे.
           युवकांनी स्वयंस्फुर्तिने रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आशिष हनवते यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या