भाजयुमो जिल्हा सरचिटणीसपदी महेश देवकते, विवेक बोढे यांची नियुक्ती.
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राकेश पुन, सचिव दिनेश सूर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष (संयोजक) मोहन कलेगुरवार यांची नियुक्ती.
भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी भाजयुमोची जिल्हा कार्यकारीणी घोषीत केली आहे. भाजयुमो जिल्हा सरचिटणीसपदी महेश देवकते, विवेक बोढे आणि सचिन नरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी अमित गुंडावार, आशिष ताजने, सचिन डोहे, राकेश पुन, मिथीलेश पांडे, मोहन चलाख, इम्रान खान, अमीत चवले, सुशांत शर्मा, विशाल करंडे, विशाल शर्मा, प्रवीण मोहुर्ले, प्रकाश नन्नावरे यांची तर भाजयुमोच्या जिल्हा सचिवपदी ओम पवार, पुनेश गांडलेवार, राहूल बिसेन, सरेंद्रसिंह खडका, महेश श्रीरंग, केतन शिंदे, तनय देशकर, शिवाजी चांदेकर, दिनेश सूर, रोशन ठेंगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थी आघाडीचे जिल्हा संयोजक म्हणून मोहन कलेगुरवार, सहसंयोजकपदी प्रतिक बारसागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा युवती संयोजिका म्हणून स्वाती देवाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मिडीया जिल्हा संयोजकपदी देवा बुरउकर, आशिष मामीडपेल्लीवार, मंगेश मदेशवार, राहूल कांबळे, हितेश गाडगे, आदित्य शिंगाडे यांची तर सोशल मिडीया सहसंयोजकपदी योगेश खोब्रागडे, शुभम समर्थ, श्रीकांत कुचनवार, गुणवंत चपटकार, आशिष वाढई, सागर धुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा कार्यकारीणी सदस्यपदी कौशिक काळे, मंगेश भोयर, प्रचलित धनरे, अभिषेक सातोकर, आशिष पोटे, राहूल चाहारे, अमोल देऊळकर, चंद्रशेखर पहापळे, रोशन मुद्दमवार, लीलाराम राऊत, सदानंद किन्हेकर, श्रीकांत हेडाऊ, बबलु गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. रामदास आंबटकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, विजय राऊत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड. संजयजी धोटे, जैनुद्दीन जव्हेरी, सुदर्शन निमकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजयुमोचे जिल्हाध्यख आशिष देवतळे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम आदींनी अभिनंदन केले आहे.