धरणे आंदोलनात आटो रिक्षा चालक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- नवरगाव ते सिंदेवाही रोडच्या बाजूला मुरुमांचा स्लोप भरण्यात यावा यासाठी अनेक वर्षांपासून निवेदन देण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही यांना देण्यात आलेले होते मात्र या कडे त्यांनी दुर्लक्ष्य करीत असल्यामुळे. तसेच त्या रोड नि अपघाताचे प्रमाण मोठ्यांनी वाढत असल्यामुळे सामाजिक युवा ब्रिगेड संगठना नवरगाव यांनी या रोडची दखल घेत भव्य धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनाची दखल घेण्याकरिता स्वता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी श्री घाले साहेब यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले तसेच या 2 दिवसात स्लोप भरून देन्याचे लेखी निवेदन दिले. त्या नंतर या धरणे आंदोलनाची सांगतां करण्यात आली. या धरणे आंदोलनात सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष्य श्री अमोल सेवादास निनावे, सदश्य प्रमोद बारसागडे, प्रणय गायकवाड, अर्चना कुंबरे, चक्रधर चावरे, गजानन गुरुनुले, बाळू लोखण्डे, समीर बावणे, आदित्य धोंगडे, आटो रिक्षा चालक इरफान पठाण तसेच त्यांची पूर्ण युनियन मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होते तसेच नवरगाव वाशीय जनता मोठ्या प्रमाणत या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.