(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- भारताला स्वातंत्र्य मिळुन ७३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही अणु जाती प्रवर्गातील बहुतांश समाज बांधव अजून ही विविध प्रकारच्या लाभापासून वंचित आहे या सर्वांचं विकास झाला पाहिजे या साठी अणुजाती प्रवर्गात अ,ब,क,ड वर्गवारी करून अपेक्षित समाजाला सविधानीक आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे हा उंदात हेतु समोर ठेवून लोक स्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मोर्चा, आंदोलन, उपोषण, रास्ता रोको असे विविध प्रकारचे कार्यक्रम सातत्याने होत असतात २७ ऑगस्ट २०२० ला सर्वोच्च न्यायालयाने अणुजातीचा वर्गीकरणाचा सर्वस्वी अधिकार संबंधित राज्य सरकारला दिलेला आहे सोबतच ०९ डिसेंबर २०२० रोजी नांदेड बिलोली शहरात एका मुक बधीर मुलीवर ज्या नराधमांनी सामुहिक लैंगिक अत्याचार करुन दगडाणे ठेचुन हत्या केला या घटणेचा निषेध महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोर्चा आंदोलन आयोजित करण्यात आलेले असताना त्यांचाच एक भाग म्हणून २८ डिसेंबर २०२० रोजी लोक स्वराज्य आंदोलन या संघटनेच्या वतीने जिवती तहसील कार्यालयावर प्रचंड आकोश एल्गार मोर्चा काढण्यात आला होता व एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील विविध भागात निषेध नोंदविला असताना सुद्धा अजुनही गुन्हेगार अटक झालेला नाही त्यामुळे बलात्कार करून खून करणाऱ्या या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कडक शिक्षा करण्यात यावे व इतर सर्व मागण्या घेऊन लोकराज्य आंदोलनाच्या वतीने जिवती तहसील कार्यालया समोर दिनांक २३,२४,२५ व २६ जानेवारी २०२१ पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत आहे यात युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड मा. दत्तराज गायकवाड जिल्हा प्रमुख मा. डॉ तानाजी कांबळे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष मा. बालाजी शिवमोरे जिल्हा सरचिटणीस मा. डॉ चरणदास केदासे महिला आघाडी ची सौ. इंदुताई काकडे आशाताई गडबे लताताई डकरे व तालुका प्रमुख मा. दशरथ पलमटे दशरथ कुटेवाड कृष्णा मोरे शहीर ढगे नामदेव तोगरे विजयभाऊ गोतावळे जमालुदिन भाई शेख मथीन भाई शेख व इतर पदाधिकारी उपस्थित आहे.