ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा: मनसेची मागणी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 27, 2021
पोंभुर्णा:- कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि तिशेषतः महाराष्ट्रात दि. २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान अतिकटोर टाळेवंदी होती. या काळात महावितरण कडून ना वीज मिटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले व जी वीज देयके वितरित करण्यात आली. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनी कडून अचानक वापरपेक्षा तिप्पट-चौपट रकमेची जवाजवी व भरमसाठ वीजबिले पाठवली गेली. या वीजबिलांचे आकडेच इतके मोठे होते की ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीयांनाही भोवळच आली. करोना टाळेबंदीच्या दिवसांमध्ये व्यापार, उदयोग बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले असताना आणि अनेकांच्या पगारात २५ ते ५० टक्के कपात झाल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असताना वीजबिलांची भरमसाठ रक्कम भरणं बहुसंख्य नागरिकांना शक्यच नव्हतं. 

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी नागरिकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर ऊर्जामंत्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या. प्रत्येक बैठकीनंतर “वीजबिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ” असं आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिलं. तशा बातम्या सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि दैनिकांमध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या.

ऊर्जामंत्री आपल्या शब्दाला जागतील आणि त्यांच्यामुळे वीजबिलांत कपात होऊन करोना संकटकाळात थोडासा आर्थिक दिलासा मिळेल, या आशेवर राज्यातील नागरिक असताना ऊर्जामंत्र्यांनी अचानक घुमजाव केलं आणि प्रत्येक वीजग्राहकाला वीजबिल भरावेच लागेल” असं फर्मान काढलं.

       ऊर्जा मंत्री यांनी शब्द देऊन आपला शब्द फिरवून महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मनसे पोंभुर्णा तर्फे २६/१/२०२१ रोजी पोंभुर्णा शहर सहायक पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थित जिल्हासचिव बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ मा. किशोर भाऊ मडगुलवार, तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार, म.न. वि.से. तालुका अध्यक्ष आशिष नैताम, मनसे.शहर अध्यक्ष निखिल कन्नाके, तालुका सचिव अमोल ढोले, जिवन भाऊ गेडाम प्रजोत मानकर, देवा मानकर, आदी पदाधिकारी तसेच मनसैनिक उपस्थित होते.