नूरानी बहुउद्देशीय युवा मित्र मंच, गडचांदूर तर्फे आ. प्रतिभाताई धानोरकर यांचा वाढदिवस साजरा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली नूरानी बहुउद्देशीय युवा मित्र मंच, गडचांदूर तर्फे महिलांना समाजात हक्कांचं व्यासपीठ निर्माते व युवतींचे प्रेरणास्रोत आ. प्रतिभाताई धानोरकर यांचा वाढदिवस साजरा अनाथ अश्रमातील बालगृहातील बालकांना ब्लॅंकेट व ड्रायफ्रूट चे वितरण व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व गरजू लोकांना ब्लॅंकेट चे वितरण करण्यात आले.



      यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक इर्शाद रजा कादरी व आयोजक म्हणून नूरानी कमेटी चे अनिस कुरैशी, सकलैन शेख, इमरान शेख, रोहित शिंगाडे, अक्षय गोरे, सोहेल शेख, शेख शारुख, फय़ाज खान, वसीम सय्यद, जावेद सेख, अदनान, साहील, मुस्तकीम, समीर अहमद, हसनैन, शख इर्शाद, जुबेर शेख, तनविर कादरी, सुफियान मेमन,फरदिन रज़ा आदी उपस्तिथ होते