मुल:- बौद्ध विकास मंडळ मूल, विहीरगाव आणि शिवशाही मित्र परिवार तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलित व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आपले मनोगत व्यक्त करताना निखिल भाऊ वाढई यांनी म्हटले माता ही केवळ प्रेमळ नसून एका मोठ्या शक्तीचा प्रतिबिंब आहे यांच्या जिवंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. त्यांचा संस्काराने शत्रूच्या स्त्रीला बहीण म्हणून सन्मान देणारा एकमेव रयतेचाराजा छत्रपती शिवाजी महाराज घडले. तसेच आकाश येसनकर यांनी म्हटले छत्रपती जन्माला येण्यासाठी, आधी जिजाऊ घडवाव्या लागतात. जगात अनेक राण्या झाल्या, महाराण्या झाल्या पण जिजाऊंसारखी राजमाता दुसरी झाली नाही. आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न तीने पुत्र शिवबाच्या मनात पेरलं. प्रणित पाल यांनी म्हटले राजमाता जिजाऊ म्हणजे शिवबांचे ज्ञानपीठ, शिवबाचे विद्यापीठ, राजमाता जिजाऊ यांच्या परिचयासाठी पती, पुत्र वा नातवाच्या ओळखीच्या पुस्तीची गरज नाही. राजमाता जिजाऊ म्हटलं की पुरे! नुसतं राजमाता म्हटलं तरी ओठांवर आपसूक जिजाऊ शब्द येतो. संचालन दिलीप भाऊ गेडाम यांनी केले. आभार प्रमोदभाऊ गेडाम यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीते साठी शम्मीभाऊ डोर्लीकर यांनी प्रयत्न केले. तसेच मित्रपरिवार रोहित शेंडे, सुधीर वाडगुरे, सौरभ वाढई, सुरज गेडाम, निहाल गेडाम, हर्षल भुरसे, सोहन दहिलकर, चेतन दहिवले, प्रणय रायपुरे, साहिल खोब्रागडे, निरज डोर्लीकर, आनंद येसनकर, सायक खोब्रागडे, प्रथम गेडाम, तुषार घ्यार, अक्षय दुमावार, करण डोर्लीकर तसेच मित्र परिवार उपस्थित होते.