"तो" येतोय सर्वांच्या मदतीला आणि जिंकतोय सर्वांचं मन! म्हणून होतो सत्कार.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 13, 2021


सावली:- १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस अर्थातच राष्ट्रीय युवा दिवस....त्या निमित्ताने महात्मा फुले वाचनालय सावली येथे राष्ट्रीय युवा दिवस पार पडला. अशातच सावित्रीमाई जोतीराव फुले जयंती महोत्सवात एक मुलगा प्रत्येक कामात मदत करायचा. वयाने लहान पण स्वभावाने मनमिळावू. कोणीही काम सांगितलं तरी नाही हा शब्द कधीच ऐकायला मिळाला नाही , म्हणून फुले स्वयंसेवकांनी त्याचा सत्कार करायचं ठरवलं आणि तो प्रस्ताव ज्ञानजोती फाउंडेशन समोर ठेवण्यात आला आणि त्यातच त्याला मंजुरी मिळाली...
              अखेर त्याचा राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सत्कार करायचं ठरवलं आणि काल तो पार पडला. त्याला ज्ञानजोती फाउंडेशन तथा माळी समाजाच्या वतीने एक ड्रेस घेऊन देण्यात आला आणि त्याला सन्मानाने तो प्रदान करण्यात आला....हा मुलगा दुसरा कोणीही नसून सर्वांचा लाडका अंकुश बंडू ढोले उर्फ शेवण्या.....