रा कॉ च्या राजूरकर व यंग चांदा ब्रिगेडच्या जोशीं, आगलावेचा भाजपात प्रवेश.

Bhairav Diwase
महानगर भाजपा मध्य मंडळाची बैठक संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक राजू जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीच्या अध्यक्ष विशाखा राजूरकर व यंग चांदा ब्रिगेडच्या आरती आगलावे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केल्याने पक्ष संघटनेला बळकटी प्रदान होईल असे प्रतिपादन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.
ते शुक्रवार(८जानेवारी)ला जैन भवन येथे भारतीय जनता पार्टी महानगर मध्य मंडळाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

        यावेळी भाजपा जेष्ठनेते विजय राऊत,महामंत्री(श)राजेंद्र गांधी,सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले,माध्यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर,जिल्हा उपाध्यक्ष ऍड सुरेश तालेवार,सुरज पेदूलवार,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष(श) अंजली घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष(श)विशाल निंबाळकर,सचिव रामकुमार अकापेलीवर,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष(श) विनोद शेरकी,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवर,नगरसेवक राजू अडपेवार, आशा आबोजवार, शितल कुळमेथे युवा नेते रघुवीर अहीर, धंनजय हुड, रमेश भुते,बाळा कोलनकर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

     डॉ गुलवाडे म्हणाले,सबका साथ सबका विकास हे चरितार्थ करण्यासाठी सबका 'आत्मविश्वास' आवश्यक आहे.जनतेचे प्रश्न सोडवूनच आपण मन जिंकले पाहिजे. यावेळी राजेंद्र गांधी म्हणाले,सत्तेपेक्षा संघटन श्रेष्ठ आहे.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान राखत,नव्याने प्रवेशित मान्यवरांना आपल्यात सामावून घ्या.तर अंजली घोटेकर यांनी,कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो सांगत,किल्ल्याच्या आतील मनपाच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.यावेळी विजय राऊत,ब्रिजभूषण पाझारे,विशाल निंबाळकर यांनीही समयोचीत मार्गदर्शन केले.राजु जोशी,विशाखा राजूरकर,आरती आगलावे यांना भाजपाचा दुपट्टा प्रदान करून पक्षात प्रवेश देण्यात आला.
बैठकीचे संचालन कृष्णा चंदावार यांनी तर रवींद्र गुरनुले यांनी प्रास्तविक केले.सचिन कोतपल्लीवर यांनी आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कित्येक वर्षांपासून काम करीत आहे. सत्ता आल्यावरही कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. याविपरित भाजपा कडे राज्यात सत्ता नसतांना, कोरोनाच्या संकटात भाजपा आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे नेतृत्वात जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. म्हणून आ. मुनगंटीवार व हंसराज अहीर(भैया)यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश करीत आहे. अशी प्रतिक्रिया रा कॉच्या विशाखा राजूरकर यांनी भाजपात प्रवेश घेतांना नोंदविली.