Top News

वरूर येथे ट्रक्टर चलीत पर्हाटी कुटी यंत्र (कॉटन श्रेडर) प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांची उपस्थिती.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजुरा यांच्या वतीने आज दिनांक 8 जानेवारी रोजी कॉटन श्रेडर(ट्रॅक्टरचलित पऱ्हाटी कुट्टी यंत्र )चे प्रात्यक्षिक वरुर येथील शेतकरी मुरलीधर धोबे यांचे शेतात करण्यात आले. सदर प्रात्याक्षिकास राजुराचे उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे ,नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अजिनाथ तेले साहेब, तालुका कृषी अधिकारी . विठ्ठल मकपल्ले साहेब, नवदृष्टी महिला विकास संस्थेचे प्रमुख निलेश देवतळे ,भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष राजजीवन वाघमारे ,कृषी विभागातील कृषी सहाय्यक दातारकर ,चव्हाण ,कदम ,खिल्लारे ,दिनेश पारखी,लक्ष्मण बाघूल व राजुरा तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.या यंत्राच्या वापराने पऱ्हाटीच्या होणाऱ्या कुट्टीमुळे शेतजमिनीची पोत सुधारून सुपीकता वाढेल त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी या यंत्राचा वापर करने किती अत्यावश्यक आहे या संबधी कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.शेतीमधील दिवसेंदिवस वाढणाऱ्या मजुरांच्या खर्चामुळे शेतकरी बेहाल झाला असून कृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाई वर मात करने आता शक्य झाले आहे.पऱ्हाटी कुट्टी यंत्र हे अतिशय सोपे,जलद व कार्यक्षम यंत्र असून निश्चितपणे श्रम,वेळ आणि पैशाची बचत होते.येणाऱ्या काही वर्षात शेतजमिनीमध्ये सुधारणा होऊन शेतकऱ्यांची नक्कीच विकासाकडे वाटचाल होईल असे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
    प्रात्याक्षिकास उपस्थित राहिलेल्या सर्व अधिकारी व शेतकऱ्यांचे भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या संचालक मंडळाने आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने