Top News

विद्यार्थ्यांची अशीही सतर्कता ऑक्सिमिटर स्थर तपासून दिला केंद्रप्रमुखांना वर्गात प्रवेश.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील ढोरवासा केंद्रातील आज पासून सुरू झालेल्या वर्ग पाचवी ते आठवीच्या वर्गाला केंद्रप्रमुखांनी भेट दिली असता आठवीच्या विद्यार्थ्यांनि प्रवेशद्वारा वर केंद्रप्रमुखांचा ऑक्सिमिटर स्थर तपासून वर्गात प्रवेश दिला.

ढोरवासा केंद्रांतर्गत येत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मुरसा येथे आजपासून वर्ग आठ सुरू करण्यात आला आहे पहिल्याच दिवशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड साहेब यांनी भेट दिली असता वर्ग आठ च्या विद्यार्थ्यांनी साहेबांचा वर्गात प्रवेश व्हायच्या अगोदर साहेबांची ऑक्सिमिटर लेवल तपासली, सॅनीटराझर केले व नंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नंतर साहेबांनी वर्गात प्रवेश केला.

  या अचानक घडलेल्या प्रसंगाने साहेब पण अचंबित झाले व वर्गाचे कौतुक केले. वर्गात साहेबानी मुलांशी खूप सुंदर असा संवाद साधला, विद्यार्थ्यांना कोरोना विषयी मार्गदर्शन केले व विविध उदाहरणाद्वारे मुलांना बोलके केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या स्वागताने साहेब खूप प्रभावित झाले व हा उपक्रम पूर्ण केंद्रात राबविण्याचा मानस बोलून दाखविला

     याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. नीता पाईकराव, पुंजेकर सर, धोटे सर, नेवारे सर, वर्ग शिक्षक मानकर सर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने