Top News

हनुमान मंदिर समिती व मित्र परिवार तर्फे हनुमान खिडकी बुरुज क्र. १५ येथे प्रजासत्ताक दिन साजरा.


Bhairav Diwase.     Jan 28, 2021

चंद्रपुर:-  हनुमान खिळकी येथील बुरुज क्रमांक 15 येथे  हनुमान मंदिर समिती व मित्र परिवार तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी किल्ले संवर्धनासाठी देशविख्यात समाजसेवक पर्यावरण रक्षक इको-प्रो चे संस्थापक बंडू भाऊ धोतरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. इको-प्रो ची टीम देखील उपस्थित होती, प्रामुख्याने भाजपा चंद्रपुर महानगर बाजार मंडळ अध्यक्ष सचिन भाऊ कोतपल्लीवार, सर्वप्रिय शिवसैनिक गणेश भाऊ रासपायले यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. 

    देशाप्रती असलेले प्रेम हे विशिष्ट दिनी साजरा करून आभासी सोशल मीडिया वर मर्यादित न ठेवता आपल्या जीवनामध्ये बांधिलकी जोपासुन आपली कर्तव्ये स्वीकारून देशहित कार्य करावे,शहर वासीयांना लाभलेले किल्ले आणि पर्यावरण गोष्टी यांचे संगोपन आणि संरक्षण करावे असे मार्गदर्शन उपस्थित जनसमुदाय व विद्यार्थी यांना बंडू भाऊ धोतरे यांनी संबोधित केले.


परिसरातील मुलामुलींनी अनेक महापुरुषांचे वेशभूषा स्वीकारून देशभक्तीपर कविता व भाषण देऊन कार्यक्रमाचे सौंदर्य वाढविण्याचे कार्य केले. 

परिसरात असलेल्या भव्य चौक मध्ये भारत माता पुजन देखील करण्यात आली, यासोबतच काही बाल कलाकारांनी व्यसनमुक्ती या विषयावर देखील परिसरातील प्रत्येक चौक स्थानी नागरिकांना समाजाचे खरे चित्र दाखवणारे पथनाट्याचे सादरीकरण करून उपस्थित नागरिकांना व्यसनमुक्ती चे धडे सादर करून त्यांना विचार करावयास लावले.

 "सेवा परमो धर्म" हे उद्देश ठेऊन मंदिर समिती तर्फे नेहमी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम, कार्यक्रम आणि सेवा देण्यात येत असते.

वंदे मातरम,जय हिंद,जय जवान जय किसान नारे जयघोष म्हणत ही रॅली पुन्हा ध्वजारोहन स्थानी पोहचली,

 सहभाग घेतलेल्या प्रत्येक बालकलाकारांना मंदिर समिती तर्फे प्रोत्साहनपर बक्षीसांचे वितरण करण्यात आले  कार्यक्रमाचे निरोप समारोप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने