🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ नागपूर विभागाच्या वतीने ऑनलाईन काव्यसंमेलन संपन्न.

भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत काव्यमय मेजवानी.
Bhairav Diwase.     Jan 28, 2021
चंद्रपूर:- अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ नागपूर विभागाच्या वतीने भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नागपूर विभागातील कवी कवयित्री यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन काव्य संमेलन पार पडले. सदर काव्य संमेलनात नागपूर विभागातील नागपूर, वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील अनेक कवी कवयित्री यांनी सहभाग घेतला.काव्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून राज्याध्यक्ष नटराज मोरे,तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसचिव विजय जोगमार्गे व अमरावती विभाग अध्यक्ष बाबाराव डोईजड उपस्थित होते.सदर ऑनलाईन काव्य संमेलना मध्ये 
मुरलीधर खोटेले ,संतोष मेश्राम ,भारती लखमापुरे ,रवींद्र गेडाम ,अशोक बोरकुटे,सोनाली रायपुरे-सहारे,पुरुषोत्तम मैंद,योगेश्वरी देऊरमले ,नागेंद्र नेवारे,प्रिती बोदलकर,आशा चौधरी,संगीता बांबोळे,राकेश शेंडे,शिवाजी जाधव,रजनी सलामे,महेंन्द्र कोल्हटकर ,सुचिता कुनघटकर,मधुकर दुफारे,गितेश किसान,संगीता घोडेस्वार,नीरज आत्राम,राजेश चौधरी,विजेता चन्नेकर,मदन मत्ते ,छाया जांभुळे यांनी बहारदार रचना सादर केल्या.काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री सातोकर यांनी तर आभार प्रदर्शन नागेंद्र नेवारे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी किशोर चलाख,किशोरकुमार बन्सोड,संतोष मेश्राम,नंदकिशोर मसराम यांचे सहकार्य लाभले.