🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पोंभुर्णा येथील विकास नगर वार्ड क्रमांक १ मधील गेट ला संताजी जगनाडे महाराज यांचे नाव द्यावे.

नंदकिशोर बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन.
Bhairav Diwase.      Jan 28, 2021
पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील वार्ड क्रमांक १ विकास नगर येथे स्वागत गेट तयार केला जात आहे त्या स्वागत गेट ला संताजी जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नंदकिशोर बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
    संताजी जगनाडे महाराज यांना माननारा पोंभुर्णा तालुक्यात मोठा वर्ग आहे.संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांचे ग्रंथाचे वाचन केले त्यांनी ते लिहुन काठले त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार केला. त्यांचे गाथा आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरत आहेत.त्यांचा विचारांचं सन्मान व्हावा यासाठी पोंभुर्णा शहरातील वार्ड क्रमांक १ विकास नगर येथे प्रवेश व्दार निर्माण झाला आहे त्या प्रवेश व्दाराला संतांजी जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देताना नंदकिशोर बुरांडे,राकेश नैताम,अमोल देवताडे,रुषी गव्हारे, महादेव सोमनकर, बाबुराव सातपुते, दिनेश बुरांडे, अमोल देवताडे, अरुण नैताम, देवराव दुधबडे,शंकर धोडरे, रामदास गव्हारे,सदा देवताडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.