Top News

माजी मुख्यमंत्री स्व. मा. सा. कन्नमवार यांचे नाव सभागृहावरुन कापले.

दोषींवर कारवाई करण्याची युवा विदर्भ बेलदार समाज संघटनेची मागणी.

बोर्डा दिक्षित गावात तनावाचे वातावरण, पोलिस तैनात.
Bhairav Diwase.     Jan 28, 2021
पोंभुर्णा:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.सा.कन्नमवार यांचे नाव बोर्डा दिक्षित येथील सभागृहाला देण्यात आले होते तसे सभागृहावर नाव लिहण्यात आले परंतु सदर नाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कापल्याने सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आणि यांतच तनावाचे वातावरण निर्माण झाले असुन त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेलदार समाजाचे दैवत असलेल्या मा.सा.कन्नमवार यांचे नाव सभागृहावरुन कापणार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा विदर्भ बेलदार समाज संघटनेने केली आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर ग्रामपंचायत अंतर्गत बोर्डा दिक्षित या गावात सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. या सभागृहाला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत स्व.मा.सा.कन्नमवार हे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला त्यामुळे सभागृहाला स्व.मा.सा. कन्नमवार सभागृह असे नाव लिहिण्यात आले.परंतु गावातील काही लोकांनी यावर आक्षेप घेतला आणी ग्रामपंचायतीचे माध्यमातून नाव पेंट मारुन पुसण्यात आले. यामुळे बेलदार समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष संजय कुरेवार, उपाध्यक्ष केशव गेलकिवार, सचिव निलेश महाजनवार यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीचे स्पष्टीकरण.....

सामाजिक सभागृहाला माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचे नाव देण्याचा ठराव ग्रामपंचायने एका वर्षांपूर्वी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाला तो ठराव पाठविण्यात आला. परंतु संबंधित विभागाकडून या ठरावाच्या अनुषंगाने कोणतेही पत्र अथवा सूचना आल्या नाही. दुसरीकडे केशव मेलकीवार यांनी ग्रामपंचायला कोणतीही पूर्वसूचना न देता स्वखर्चाने सभागृहाला नाव दिले. त्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला. शेवटी वाद पोलिस ठाण्यात पोहचला. दोन्ही गटाच्या सहमतीने सामाजिक सभागृह बोर्डा असे नाव देण्यात आले, असे ग्रामपंचायतने स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने