Top News

आता युद्धसामुग्रीसह मातृभूमीचे संरक्षण करणारे हातही चंद्रपुरातील असतील.

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रतिपादन.

तुकुम प्रभागातील विकास कामांचे झाले उद्घाटन.
Bhairav Diwase.    Jan 28, 2021
चंद्रपूर:- कर्मवीर मा सा कन्नमवार अल्पकाळासाठी मुख्यमंत्री होते.चंद्रपूरच्या या महान भुमीपुत्राने भद्रावतीमध्ये बॉम्ब तयार करण्याचा कारखाना सुरू केला.येथील बॉम्ब युद्धात वापरण्यात आले.मला जनतेनी संधी दिली म्हणून अत्याधुनिक सैनिकी शाळा या जिल्ह्यात आणू शकलो. आता चंद्रपुरात उच्चप्रतीचे सैन्य अधिकारी व सैनिक तयार होतील.त्यामुळे देश संकटात असेन तेंव्हा चंद्रपूर येथील कारखान्यात तयार झालेले बॉम्ब आणि मातृभूमीच्या संरक्षणासाठी शत्रूवर बॉम्ब टाकणारे हातही चंद्रपुरातील असतील असे प्रतिपादन महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.ते गणराज्य दिन निमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार यांच्या पुढाकारातून झालेल्या तुकुम प्रभागातील विविध विकास कामांचे उदघाटन झाले त्यानंतर पमंगळवार(२६जानेवारी)ला जनसभा पार पडली.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून,महापौर राखी कंचर्लावार,बाल कल्याण सभापती शीतल गुरनुले,भाजपा नेते प्रकाश धारणे,ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, माया मांदाडे, प्राचार्य प्रज्ञा गंधेवार, शीला चव्हाण, माया उईके, प्रशांत विघ्नेश्वर, अमिन शेख, विठ्ठल डुकरे, विजय चितळे, पुरुषोत्तम सहारे, रमेश वेगिनवार, सुधाकर टिकले,मनोहर बोक्कावार,वसंत धंद्रे,सुधाकर बोंडे, निलेश हिवराळे, गजानन भोयर, रवी आसवानी, पुष्पा उराडे, जितेंद्र वाकडे, रतन दातारकर यांची उपस्थिती होती.

आ.मुनगंटीवार म्हणाले,जनतेनी संधी दिली,म्हणून ५ वर्षात ११४ विकासकामे पूर्ण करून लोकार्पित केली.ज्या पक्षाचा मी आहो,तेथे सत्ता नाहीतर सत्य,स्वार्थ नाहीतर सेवेला महत्व आहे.
आज समाजात जातीपातीचे विष पेरले जात आहे.सत्कारात दिलेल्या या तलवारीच्या बळावर समाज एकत्रित करून अमृताचा कुंभ लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे.
बालोद्यान हे लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे केंद्र आहे.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद म्हणजे देवांच्या चेहऱ्यावरील आनंद होय,असे ते म्हणाले.
जिल्ह्यात माफियाराज सुरू झाला असून अवैध धंद्याला उत आला आहे.हे विषवृक्ष नष्ट करण्यासाठी जागरूक होण्याचे आवाहन त्यांनी केले.
आ.मुनगंटीवार यांचे हस्ते हनुमान नगर प्रवेश द्वार,एल इ डि लाईट,दुर्गा माता चौक व श्री स्वामी समर्थ-शिवनेरी ग्राउंड बालोद्यानचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी आ मुनगंटीवार यांनी दारूबंदी सुरू रहावी म्हणून लोकजागर करणाऱ्या व व्यसनमुक्ती अभियान राबविणाऱ्या ४५ भजन मंडळांना प्रमाणपत्र देऊन गौरवांन्वित केले.या भजन मंडळांनी स्थापन केलेल्या चंद्रपुर जिल्हा दारुमुक्ती कृती समितीचे अध्यक्ष विजय चिताडे,सचिव सखाराम नन्नावरे,उपाध्यक्ष अण्णाजी ढवस यांचा सत्कार करण्यात आला.
पार्षद सुभाष कासनगोट्टूवार,  त्यांच्या सुविज्ञ पत्नी मंजुश्री कासनगोट्टूवार व प्रभागवासीयांनी आ मुनगंटीवार यांना श्री संत शिरोमणी सखाराम महाराज यांची प्रतिमा व बांबू द्वारा निर्मित तलवार भेट देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाला धवल चावरे,आशिष ताजणे, प्रा. विश्वनाथ राठोड, सिंधू चौधरी, आकाश म्हस्के, संजय कोत्तावार, मनोज हिवराळे, संजय पोडे, सुधीर टिकेकर, अनुराग दांतूलवार,सुवर्णा लोखंडे, मनीषा ताजणे, नंदा मस्के, कल्पना गिरडकर, वंदना संतोषवार, उषा मेश्राम, प्रशांत दौड, महेश कोलावार, बंडू गौरकार, दिनकर सोमलकर, मनोरंजन राय, प्रा.संजय गवळी,बबनराव अनमोलवार, धर्माजी खंगार, वामिनी मेंढे, वेणूताई टोंगे, सुरेखा बोंडे, सचिन हरणे,चैताली नवले, वृंदा हूलके, अर्चना मोरे, इंदिरा चोपकर,  अपर्णा चीडे, वृषाली धर्मपुरीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी भारती उपाध्याय यांनी स्वागत गीत सादर केले.प्रास्ताविकात  सुभाष कासंगोट्टूवार यांनी प्रभागातील विकासकामांची माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन प्रा. विश्वनाथ राठोड यांनी केले तर मंजुश्री कासंगोट्टूवार यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने