अ.भा.मराठी साहित्य परिषद ची चंद्रपूर तालुका कार्यकारिणी गठीत.

Bhairav Diwase
अध्यक्षपदी सुशांत मुनगंटीवार तर सचिवपदी अतुल येरगुडे नियुक्त.
Bhairav Diwase. Jan 06, 2020



चंद्रपूर:- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तालुका शाखा चंद्रपूर ची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. तालुका अध्यक्ष म्हणून पं. स. जिवती येथील जि. प. प्रा. शा.चिलाटीगुडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे स्थानिक चंद्रपूर येथील कवी श्री. सुशांत भास्करराव मुनगंटीवार यांची तर तालुका सचिव म्हणून तालुक्यातील प्रसिध्द कवी , नाटककार व पथनाट्य कलावंत म्हणून राज्यभर शासनाच्या लोकोपयोगी कार्याचा प्रसार व जनजागृती करणारे कवी अतुल येरगुडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्ष- म्हणून प्रसिद्ध कवी श्री गोपाल शिरपूरकर सर , उपाध्यक्ष - श्री. महेश कोलावार , श्री. पवन श्रीवास्कर ,कोषाध्यक्ष - श्री. अभय दुर्गे ,सहसचिव - श्री. स्वप्नील मेश्राम ,प्रसिद्धी प्रमुख - श्री.राकेश शेंडे ,संपर्क प्रमुख - श्री. विघ्नेश्वर देशमुख ,संघटक - श्री.शेष देऊरमल्ले , महिला आघाडी - सौ.हेमलता मेश्राम तर मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कवी श्री. जगदीश नंदूरकर सर यांची निवड करण्यात आली .जिल्हाध्यक्ष श्री नीरज आत्राम सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
       तालुक्यातील नवकवींना प्रोत्साहन देऊन साहित्य निर्मिती मध्ये अधिकाधिक तालुक्यातील योगदान कसे वाढवता येईल व वाचक वर्ग कसा वाढविता येईल याविषयी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित कार्यकारिणी ने विचार व्यक्त केले आहेत.  
          नवनिर्वाचित कार्यकारिणी चे अ. भा. म.सा.परिषद चे विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री. आनंदकुमार शेंडे , जिल्हाध्यक्ष श्री. नीरज आत्राम, कवी श्री संतोष उईके सर ,दुशांत निमकर सर , संभाशिव गावंडे , संजय सेलोकर , अविनाश झाडे आदींनी स्वागत व अभिनंदन केले आहे तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.