दोन दुचाकीच्या अपघातात तीन जखमी.

Bhairav Diwase. Jan 06, 2021



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती

भद्रावती:- बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घोडपेठजवळ झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.

     दुचाकी क्र.एम.एच.३४,बी.डी.१७४७ आणि एम.एच.३४,ए.एच.४७२८ या दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. त्यात रवींद्र नीळकंठ पारोधी(४७) रा. चंद्रपूर, सुनील रामभाऊ सिडाम(२७) रा. चंद्रपूर आणि शामराव रावजी वाटेकर (६०) रा. घोडपेठ हे जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पंचनामा केलाअसून पुढील तपास सुरु करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने