मकरसंक्रांत हा सण सौ. अनिता वसंत भोंगळे व सौ. सुरेखा अविनाश जाधव यांनी अनोख्या पध्दतीने केला साजरा.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दि. १६/०१/२०२१ रोज शनिवार सायंकाळला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील फिरोजशहा कॉलनी येथील महिलांनी त्या परिसरातील बगीचामध्ये मकरसंक्रांती निमित्त हळद कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला. मकरसंक्रांतीच्या दिवशी महिला वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू एकमेकांना भेट म्हणून देतात. परंतु फिरोजशहा कॉलनी येथील महिला रहिवासी सौ. अनिता वसंतराव भोंगळे यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्व उपस्थित महिलांना फुलांची रोपटे हे वाणाचा स्वरूपात देऊन एक नवीन संकल्पना समाजासमोर मांडली आहे. तसेच सौ. सुरेखा अविनाश जाधव यांनी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले(चरित्र)लेखक गोविंदराम शूरनर यांचे पुस्तक देऊन सर्व महिलांचे मनोबल वाढविले.
या संकल्पनेमुळे इतर महिलांना या उपक्रमाची आवड निर्माण व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न होता असे प्रतिपादन सौ अनिता वसंत भोंगळे व सौ. सुरेखा अविनाश जाधव यांनी केले.
त्याप्रसंगी सौ. सुवर्णा उईके, सौ. शामल चौखुंडे, सौ.सरिता उरकुडे, सौ.सविता गोरे, सौ. शारदा लांडे, सौ.अश्विनी लांडे, सौ.दिपाली गोरे, सौ. रसिका गोरे, सौ.कल्पना वज्जल्वार, सौ. वैशाली बानकर, सौ. वैशाली वाते, सौ.माधुरी रामटेके, सौ. छाया टोंगे, सौ.माया थेरे, सौ. सुनिता घुग्लोर,सौ. प्रतिभा काकडे, सौ. चंदा त्रिवेदी,सौ. संजीवनी चिक्कणकर, सौ. सुरेखा जाधव आणि इतर भरपूर महिला उपस्थित होत्या.