विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या वतीने ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील शेतकरी १९५०-५५ पासून शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत तरी आतापर्यंत या क्षेत्रातील भुमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे मिळालेले नाही म्हणून या शेतकऱ्यांना शासनाची कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही कारण प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन पट्टे असने आवश्यक आहे जसे एखाद्या शेतकऱ्यांना व्यवसाय काराच झाल्यास लोन घेण्या साठी बँक मध्ये कर्जाचे अर्ज केल्यास तो अर्ज नामंजूर करतात म्हणून ना. एकनाथ शिंदे यांचे सरकार व शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार आहे म्हणून मंत्री महोदय आपण आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदया समोर शेतकऱ्यांचे दुःख मांडुन जिवती तालुक्यातील भुमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्याल अशी विनंती विदर्भ राज्य आंदोलन समिती व विदर्भ राज्य युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली व जर मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल या आंदोलनात काही हिंसक घटना घडल्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले