(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रक्टर पकडून तो महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आला.
भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, क्षेत्र सहायक एन.बी.हनवते आणि वनविभागाची चमू गस्तीवर असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भद्रावती शहरालगतच्या मानोरा फाट्यावर एक ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळून आला.याबाबत ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव विलास आस्कर रा. भद्रावती असे सांगितले.तर ट्रॅक्टर मालकाचे नाव किशोर गोहणे असल्याचे सांगितले.मानोरा नाल्यातून रेतीचा उपसा केल्याची आस्कर याने वनाधिका-यांना कबुली दिली. वनविभागाने घटना स्थळाचा पंचनामा करुन ट्रॅक्टर जप्त केला व पुढील कार्यवाहीकरीता महसूल विभागाकडे तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला.