संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार यांनी केले केंद्रीय पोलीस दलात निवड झालेली विद्या मोहीतकर यांचे अभिनंदन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- केंद्रीय पोलीस दल CRPF पोलीस भर्ती मध्ये पास झालेली राजुरा तालुक्यातील जवाहर नगर वार्ड येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.वसंत मोहीतकर यांची कन्या विद्या मोहीतकर चा स्वागत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार यांनी केले. 
               या प्रसंगी साईनाथ बतकमवार व जवाहर नगर वार्ड येथील मान्यवर प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार , परसुटकर गुरूजी , देवरावजी जुनघरी , तिवारी साहेब , दौलतराव जी खिरटकर , घोरूडे साहेब , उपरे जी व इतर मान्यवर उपस्थित होते.