प्रजासत्ताक दिनानिमित्त वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण संपन्न.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 27, 2021
बल्लारपूर:-: दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दीनानिमित्त सुधीर भाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे महाराणा प्रताप वार्ड व नौरोजी वार्डातील नागरिकांना नियमित वृत्तपत्र वाचता यावे याकरिता समाजसेवेच्या दृष्टिकोनातून एक चौक वाचनालय उभारण्यात आले. या वाचनालयाचे उदघाट्न बल्लारपूर शहराचे नगराध्यक्ष श्री. हरीशजी शर्मा जी यांच्या हस्ते करण्यात आले.


तसेंच प्रमुख पाहुणे म्हणून कामगार आघाडी प्रदेश महामंत्री श्री.अजयजी दुबे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, सुधीर भाऊ फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, किशोर मोहुर्ले, मुन्ना खेडेकर, विद्यार्थीआघाडी सहसंयोजक प्रतीक बारसागडे, देविदास चौधरी, मुन्ना पाल, अल्प संख्याक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद, आबीद भाई, सुधाकर सिक्का, कमल वर्मा,अनिल, अनिकेत, खुशाल, आदर्श, प्रेरित, संजय, ऑनू तंगरम,प्रवीण निंबाळकर, दीपक जस्सी, तुषार तंगरम त्याचबरोबर कार्यक्रमात मोठ्या संख्येत वार्डातील नागरिकांची उपस्थिती होती.