अवैध धंद्यातून जिल्ह्याचे सामाजिक आरोग्य बिघडविणाऱ्या खासदार धानोरकर यांचा बंदोबस्त होणार?
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस तथा साप्ताहिक व दैनिक न्यूज पोर्टल भुमीपुत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांच्यावर खासदार बाळू धानोरकर यांच्या भाडोत्री गुंडा कडून दिनांक 15 जानेवारीला वरोरा येथील बोर्डा चौकात हल्ला करण्यात आला, खरं तर राजू कुकडे यांनी "खासदार धानोरकरांची वाराणसीत जाऊन लढायची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्यक्तिगत हल्ले करणाऱ्या नेटकऱ्यांनी परिवाराला घेरल्याने धानोरकर समर्थक चिंतेत." या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती, ज्या बातमी मधे खासदार धानोरकर यांच्या विरोधात कुठलाही मथळा नव्हता केवळ दैनिक सकाळ पोर्टल च्या फेसबुक वरील ट्रोलच्या प्रतिक्रिया तिथे नमूद करण्यात आल्या होत्या ज्या खासदार धानोरकर यांची खिल्ली उडविणार्या होत्या म्हणून त्या नमूद करण्यात आल्या, या ट्रोल च्या अनुषंगाने खरं तर धानोरकर समर्थकानी त्या ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना उत्तर द्यायला हवे होते मात्र त्या बातमीचा संदर्भच न समजनार्या खासदार धानोरकर यांनी राजू कुकडे यांनी जणू आपल्यालाच लक्ष केल्याची धास्ती घेऊन त्यांच्यावर आपल्या भाडोत्री गुंडा कडून हल्ला करण्याचा घाट घातला. जर लोकप्रतिनिधी बातम्यांची एक्सपर्ट कडून शहानिशा न करता अशा प्रकारचे भ्याड हल्ले पत्रकारांवर नैरश्यापोटी करून आपली गुंडगिरी दाखवत असेल तर असे खासदार जनतेचे खरोखरंच प्रतिनिधित्व करण्यास समर्थ आहे का ? असा प्रश्न पडतो.
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी अवैध मार्गाने जिल्ह्यात दारू येते कशी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असला तरी दस्तुरखुद्द खासदार धानोरकर यांच्या माध्यमातून त्यांच्या वणी येथील देशी विदेश दारू दुकानातून व त्यांच्याच समर्थकांकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू येते अशी चर्चा आहे, एवढेच नव्हे तर दारूच्या प्रत्त्येक पेटीमागे यांचे कमिशन आहे अशी पण चर्चा आहे, म्हणजे खासदार धानोरकर आपल्या पदाचा दुरुपयोग करून जिल्ह्यात अवैध दारूच्या व्यवसायाला बळ देत आहे. आणि जर खासदार ह्या धंद्यात असेल तर त्यांचे समर्थक हे अवैध दारू विक्रेते असणारच त्यात गुंड प्रव्रुत्तीचे भाडोत्री गुंड हे त्यांच्या इशाऱ्यांवर नाचत असेल आणि अशाच भाडोत्री गुंडाकडून पत्रकारांवर हल्ला करण्याचे छडयंत्र धानोरकर करीत असल्याने अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी हा जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळवून देऊ शकत नाही तर उलट जिल्ह्याच्या सामजिक आरोग्याला बाधा पोहचवीत आहे, त्यामुळे यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे नाहीतर यांची दादागिरी वाढून जिल्ह्याला हे बिहार केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहे.
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघात माजी खासदार हंसराज अहिर यांनी एवढी वर्ष प्रतिनिधित्व केल पण त्यांच्यावर पत्रकारांनी अनेक वेळा प्रहार केला असतांना सुद्धा त्यांनी कधीही कुणाही पत्रकारांवर हल्ला केला नाही, उलट त्या पत्रकारांना आपली भूमिका समजावून सांगितली व त्यातून त्यांनी स्वतःची चूक दुरुस्त केली, पण अवघ्या दीड वर्षातच जणू जिल्ह्यात आपले एकछत्री राज्य असल्यागत खासदार धानोरकर यांनी आपल्या समर्थकांना अवैध व्यवसायात उतरवून व त्यांच्या विरोधात जाणाऱ्यावर धमक्या व दबाव आणून एक प्रकारे गुंडगिरी चालविली आहे आणि याचे पत्रकार सुद्धा बळी पडत असल्याने खासदार धानोरकर हे चंद्रपूर चे बिहार करण्यास निघाले का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.