Top News

वनोजा येथे ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा विजय.

40 वर्षानंतर युवकांनी घडविला बदल; सर्व उमेदवार झाले विजयी.

गड आला पण, सिह गेला.
Bhairav Diwase. Jan 21, 2021
वरोरा:-तालुक्यातील वनोजा या गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा विजय आहे. या पॅनलमधील सर्व 7 पैकी 7 ही उमेदवार बहुमतांनी विजय झाले असून 40 वर्षानंतर येथील नव युवकांनी सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीचा निकालही घोषित करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायतवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय प्राप्त करत पॅनलमधील सर्व उमेदवार बहुमतांनी विजय झाले आहे. यामध्ये गावातील नव युवकांनी संपूर्ण गावाला एकत्रित करत 40 वर्षा नंतर सत्ता परिवर्तन करत विरोधी पॅनलचा दारुण पराभव केला आहे.

या गावामध्ये 40 वर्षांपासून एकाच पॅनलची सत्ता बसत होती. सत्ताधाऱ्यांना उलथून पाडण्यासाठी बरेच प्रयत्न झाले मात्र ते सर्व अयशस्वी झाले.मात्र गावातील युवकांनी ऐकत्र येत सत्ता परिवर्तन करून दाखविल्याने त्यांच्या या विजयाचे कौतुक गावकऱ्यांकडून केल्या जात आहे.

सर्व सातही विजयी उमेदवारांचे अभिनंदन वसंतराव विधाते , रामकृष्ण विधाने , दत्तूजी उताणे , दीपक किटे , महादेव ठक , गजानन उताणे , बंडूजी बोढे , आण्याजी मत्ते , श्रीराम ढवस ,नानाजी ठक , किसन जरीले , अरुण बुराडकर यांनी केले.


विजयी मिरवणुकी एवजी गावात पसरली शोककळा.......

वजोना गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागताच गावकऱ्यासह युवकांनी मोठा जल्लोष साजरा केला होता. गावात मिरवणुकीची तयारी सुरू झाली.ठिकठिकाणी विजयाचा गुलाल उधळला जात होता गावातील मिरवणुकीसाठी विजयी उमेदवारास येथील युवक तालुक्यातील गावाकडे रवाना होण्यासाठी निघाले मात्र गाव एकत्रित करून पॅनलला निवडून आण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पवन चटकी नामक युवकांना वाटेतच हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली त्यामुळे गड आला पण सिंह गेला असे भावनिक उदगार गावकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत होते.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परिवाराला धीर देत फोन वरून वाहिली श्रद्धांजली........

स्व. पवन चटकी हा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षा चा सक्रिय कार्यकर्ता होता. गाव विकासासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या मृत्यूची बातमी कळताच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः फोन करून परिवाराला धीर देत श्रद्धांजली वाहली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने