Top News

अखेर माजी मंत्री संजय देवतळे भाजपात परतले.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते प्रवेश.
Bhairav Diwase.    Jan 22, 2021
वरोरा:- राज्याचे माजी मंत्री व शिवसेनेतून नुकतीच विधानसभा निवडणूक लढलेले संजय देवतळे यांचा आज भाजपमध्ये त्यांच्या राहत्या घरी माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रवेश झाला असून विधानसभा क्षेत्रातील भाजप पक्षात नवचैतन्य निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
    
     काल भद्रावती येथील ग्रामउद्योग कार्यक्रमासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी आले होते. त्या कार्यक्रमानंतर उमरेड मार्ग त्यांना बेला येथे जात असतांना माजी मंत्री संजय देवतळे यांच्याकडे चहापाण्यासाठी आले असता त्यांनी संजय देवतळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. व भाजपमध्ये यावे व आपण जोमाने काम करावे अशी सूचना केली. व लगेच भाजपमध्ये यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला. यावेळी भाजपचे नेते बाबासाहेब भागडे नगराध्यक्ष अहेतेशाम अली व बरीच भाजप चे नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
         
   2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरोरा विधानसभा मतदारसंघात भाजप-सेना युती मध्ये भाजपला जागा निश्चित मिळेल अशी शक्यता असताना ऐनवेळी सदर जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली असल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार संजय देवतळे यांना धनुष्यबाण हातात घेऊन विधानसभा निवडणूक लढवावी असा आदेश दिला व त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर शिवसेनेत मात्र ते कार्यरत नव्हते परंतु भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे भाग घेत होते हे विषेश.
                 भाजप प्रवेशामुळे भाजपा पक्षात एक नवचैतन्य निर्माण होईल, असे भाजपाचे नेते बाबासाहेब भागडे यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने