Top News

तुलाना परिसरात कोंबडा बाजार सुरु करण्याचा प्रयत्न?

राजुरा डी. बी. पोलीसांच्या आशीर्वादाची वाट.

डी. आय. जीच्या दौऱ्यामुळे होता प्रतिबंध.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु असलेला कोंबडा बाजार डी आय जी च्या दौऱ्यामुळे बंद झाला असला तरी या कोंबडा बाजाराला पुर्नजीवित करण्याच्या हालचाली कोंबडा बाजार संचालकामार्फत सुरू झाल्या असून या करिता राजुरा पोलीस विभागाच्या डी. बी. पथकाच्या हिरव्या झंडीची वाट आहे. समजा सर्वांच्या नजरेत भरलेला आर्वी येथील कोंबडा जुगाराच्या अड्डा सुरू करण्यास अडथळा निर्माण झाल्यास "तुलाना" वरूर रोड येथील एका शेतात हा कोंबडा बाजार स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी कोंबडा बाजार संचालक व डी. बी. पथकातील सरदार ( वसुली ) या संयुक्त सर्वे नुकताच संपन्न झाल्याचे समजते.
     
        राजुरा शहर व परिसरात अवैध धंद्यांना उत आला असून खुले आम दारू विक्री, पीक पॉकेटिंग, कोंबडा बाजार, कोळसा चोरी, भंगार, सट्टा, चैन स्नकींग, चोऱ्या, घरफोड्या सुरु आहे. यापैकी दारू, कोंबडा बाजार, कोळसा चोरी, जुगार, भंगार चोरी इत्यादी धंद्यांना डी. बी. पथक पोलिसांचा खुला आशीर्वाद असल्याने अवैध धंदा करणारे मुक्त संचार करीत आहे. शहरातील धाबे, हॉटेल्स व पानठेले रात्रे १२:०० वाजेपर्यंत सुरू राहत असून या ठिकाणी अवैद्य धंदेवाले यांचा जमावेडा असतो. परंतु यांना कोणीही टोकत नाही परंतु एखादा सज्जन व्यक्ती प्रवासा दरम्यान उशिरा पोहचल्यास त्याची विचारपूस केली जाते या अगोदर डी. बी. पथक प्रमुख असलेल्या सहा पोलीस निरीक्षकाला हटवून नवीन पी.एस.आय. ची नियुक्ती करण्यात आली आहे. या महाशयांनी आल्या-आल्या ढाबा चालक, हॉटेल्स, पानठेले यांना तंबी देत खूप जोश दाखविला. परंतु एकाच आठवड्यात त्यांच्या जोशमधली "हवा" निघून गेली. त्यामुळे अवैध धंद्यावर आळा बसला नाही. शहर व परिसरात सुरू असलेले अवैध धंदे डी. बी. तील एका हट्टया-कट्टया सरदाराच्या अधिपत्याखाली सुरू असून हाते वसुलीचा चार्जही याच सरदाराकडे असल्याचे समजते.. आपले कारनामे उजेडात येऊ नये याकरिता हा डी. बी.चा सरदार चापलूस, चाटुकार, पॉकेटफेम पत्रकारांना अर्थरूपी रसद पुरवीत असतो. तर काहींना पकडलेल्या दारुपैकी बाटल्या बाहेर काढून त्यांचा आंबट शौक पूर्ण करीत असतो. मागील अनेक वर्षांपासून डी. बी. त कायम असलेल्या या लोकांनी बरीच माया जमवली असून त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.
                 
        राजुरा परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामागे पोलीसासोबतच काही राजकिय पुढाऱ्यांच्या सहभाग असल्याचे आरोप वर्तमानपत्राच्या माध्यमातून समोर आले होते. यात किती वास्तविकता आहे हे कळायला मार्ग नाही. जर असे असेल तर ही बाब समाजासाठी अत्यंत घातक आहे. असे असले तरी राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरु असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध माजी आमदार ऍड. वामनराव चटप, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, सूरज ठाकरे या नेत्यांनी बुलंद केलेला आवाज समाजासाठी आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. राजुरा येथे नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजा पवार रुजू झाले असून ते सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध काय उपाययोजना करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने