Click Here...👇👇👇

01 मार्चपासून राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे; वर्षा गायकवाड यांचे निर्देश.

Bhairav Diwase
1 minute read

Bhairav Diwase.      Feb 27, 2021
मुंबई:- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे तर काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा शाळा चालू करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोक वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्च 2021 पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.


विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. तर ज्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे तिथे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्यासंबंधी स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्यामंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येत असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत जनतेला 1 आठवड्याचा अल्टिमेट दिला आहे. कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे.