Top News

पिकअपच्या धडकेत 03 शाळकरी विद्यार्थी ठार.


Bhairav Diwase.      Feb 11, 2021
गोंदिया:- भरधाव पिकअप वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत 03 कनिष्ठ विद्यालयीन विद्यार्थी ठार झाले. बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील खजरीजवळ हा अपघात झाला.
         तुषार बीरजलाल शिवणकर (वर्ग ११, रा. मुरदोली) व शुभम नंदकुमार भिमटे (वर्ग ११, रा. मुंढरीटोला), प्रवीण संतोष कटरे (रा. डव्वा) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

      आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील तीन विद्यार्थी मोटारसायकलने विद्यालयात जात असताना कोहमारा ते गोंदिया मार्गाने जात असलेल्या मालवाहक पिकअपने (क्र. एनएच २० सीटी ६०१८) त्यांना धडक दिली. यात तुषार बीरजलाल शिवणकर, रा. मुरदोली व शुभम नंदकुमार भिमटे, रा. मुंढरीटोला या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रवीण संतोष कटरे (रा. डव्वा) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोंदिया येथील सहयोग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील शिक्षक व गावकऱ्यांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. पिकअप चालक फरार झाला. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भुरले करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने