🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

"व्हॅलेंटाईन डे" साजरा करतांना दिसल्यास तर त्याचजागी हिंदुराष्ट्र सेना कडून विधियुक्त लग्न लावणार.

हिंदूराष्ट्र सेनेचा इशारा.
Bhairav Diwase.      Feb 14, 2021
चंद्रपूर:- आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी प्रेमात पडावं. परंतु ते प्रेम मनापासून असावं. आपुलकीच्या विश्वासाच्या नात्याने, रेशमगाठीने घट्ट विणलेल असावं. वासनेचा कुठलाही लवलेश न ठेवता ते निस्वार्थ असावं. परंतु गेल्या काही वर्षांपासून विदेशी चाड्यांचं अंधानुकरण आपल्या देशात ही प्रचंठ बाढतांना दिसत आहे. अश्या बिनबुडाच्या कार्यक्रमांना पूर्णतः लगाम लागावा यासाठी हिंदुराष्ट्र सेना यांनी आक्रमक पवित्रा घेत योग्य अशी शक्तल लढवली आहे. 

    तसेच आव्हान केले आहे की, व्हॅलेंटाईन डे या विदेशी विकृतीच्या नावाखाली गेल्या काही वर्षापासून भारतीय संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केता जात आहे. दरवर्षी १४ फेब्रबारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून नव युवा तरुण व तरुणी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात; परंतु अशा पद्धतीने हा दिवस साजरा करण्याला कोणतेही शासत्रीय कारण किंवा प्रमाण नाही आहे. फक्त प्रेमाच्या नावावर अश्लील चाळे करण्याचे प्रकार होताना दिसून येतात. आता पर्यंत असे लक्षात आले आहे कि, ह्या दिवशी गर्भ निरोधक गोळ्या यांचा खपही जास्त प्रमाणत होताना दिसून येतो. ह्या दिवसानंतर लव्ह जिहाद सारखे प्रकरणाचा ही खुलासा होऊन सत्य डोळ्यां समोर येत आहे. खरच ह्या विषयाकडे प्रशासक यांचे तक्ष आहे का? आम्ही हिंदुराष्ट्र सेना हे भारतीय संस्कृतीचे हनन कदापीही होऊ देणार नाही, तसेच देशाची जी भावी पिढी आहे तिला बाममाग्गाला जाऊ देणार नाही. 
    
    ह'व्हॅलेंटाईन डे मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. प्रेमाच्या नावावर हे अश्लील चाळे यापुढे खपबून घेणार नाही. १४ फ्रेबुवारीला एक दिवस प्रेमाचा साजरा करणे ही आपली संस्कृती मुळीच नाही. आम्हाला वर्षाचे ३६५ दिवस प्रेम करायला शिकवते. झालेल्या या भूमीतुन या विकृतीला बाहेर काढावेच लागेल. यातच पुढील पिढीचे हित अवतंकून आहे. १४ फेब्रुवारी रोजी जे ही तरुण, तरुणी जिथं कुठं हा दिवस साजरा करतांना आढळतील त्याच जागेवर हिंदुंराष्ट्र सेनेकडून वैदिक शास्र शुध्द पद्धतीने शुभ विवाह त्याच जागेवर सर्व तयारीनिशी त्यांच्या पालकांसमोर लावून देण्यात येईल. त्यासाठी हिंदुराष्ट्र सेनेकडून सर्व प्रकारची तयारी राहिल. उदाः ब्राम्हण, मंगळसुत्र, उपहरणे, शिंदुर, होम हवण, वाजत्री इ. आवश्यक ते सर्व उपलब्ध असेल. जेणेकरुन पालकांना नंतर प्रेमामध्ये आपल्या बिनडोक पाल्याने पळुन लग्न केले म्हणून पश्चताप किवां डोकं आपटण्याची वेळ येणार नाही. 
    
    पालकांनी, तरुण, तरुणींनी जागरूक राहण्याचे आवाहन हिंदुरष्ट्र सेनेकडून करण्यात आले आहे.'व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसल्यास तर त्याचजागी विधियुक्त लग्न लावणार हिंदूराष्ट्र सेनेने घेतला पवित्रा.