🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

फुटाणा मोकासा ग्रामपंचायतीवर भाजपाच वर्चस्व.

सरपंच पदी संगीता तेलसे, तर उपसरपंच पदी नैलेश चिंचोलकर यांची निवड.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- फुटाणा मोकासा ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. आज सरपंच व उपसरपंच पदी निवड पार पडली. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ फुटाणा मोकासा ग्रामपंचायत सरपंच पदी संगीता तेलसे व उपसरपंच पदी नैलेश चिंचोलकर यांची निवड झाली. व सदस्य पदी संजय फुळके, राणी पाल यांची निवड झाली. फुटाणा मोकासा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. फुटाणा मोकासा गावातील मतदार बंधू भगणींचे विजयी उमेदवारांने जाहीर आभार मानले.

सरपंच पदी संगीता उत्तम तेलसे, तर उपसरपंच पदी नैलेश चिंचोलकर यांची निवड झाल्याबद्दल माजी अर्थ तथा वन नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के, तुळशीराम रोहनकर, नामदेव पाल, अमोल पाल, विनोद ओड्डेलवर, इंद्रजित वनकर यांनी अभिनंदन केले.