🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बैलगाडी ला मार्ग देताना बस ट्रकला अडकली.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- मुल-फिस्कुटी-गोंडपिपरी मार्गावरील एसटी बसची नांदगाव बस थांब्यालगत एका बैलगाडीला मार्ग देताना समोरून येणाऱ्या ट्रकने मार्गक्रमण करताना परस्पर घासत गेल्याने अडकून पडली. सदर घटना शनिवारी दु. २ वाजताच्या सुमारास घडली.
            
      खेडी-गोंडपिपरी मार्गावर धावणारी एसटी बस क्र. एम. एच. ४० एन ९४२५ ही नांदगाव बस थांब्यालगत समोरुन येणाऱ्या ट्रक क्र.सी.जी.०७,बी.के.६६४५  पुढे मार्गक्रमण करताना परस्पर घासत गेल्याने किमान १ तास रहदारी बंद पडली होती.
           
   यात बसमधील प्रवासाला कोणतीही इजा झाली नसली तरी बस ची मागील बाजूची हानी झाली. अपघातासंबंधची माहीती बेंबाळ पोलीसांना होताच सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी घटनास्थळी येवून मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.