🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चंद्रपूर जिल्ह्यातून अपहरण झालेल्या तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.


Bhairav Diwase.    Feb 14, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील युवकाचा अपहरण झाल्याच्या महिनाभरानंतर अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुभम फुटाणे असे त्या तरुणाचे नाव असून तो अमरावतीतील अभियांत्रिकी क़ॉलेजचा विद्यार्थी होता. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

तो लॉकडाऊन दरम्यान घुग्गुस येथे स्वतःच्या घरी आला होता. 16 जाने. रोजी मित्रांसोबत पार्टीला जातो असे सांगून तो घरून निघाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडे 30 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. पोलीस तपासात त्याची बाईक घुग्गुस शहरातच रस्त्याच्या कडेला आढळली होती. चंद्रपूर पोलीस गेले काही दिवस या अपहरणाबाबत अंधारात होते.

स्थानिक गुन्हे शाखेने या अपहरण प्रकरणी गांभीर्य दाखविले नाही. त्यांचे सर्व दावे सपशेल अपयशी ठरले. घुग्गुस शहरातील शांतीनगर लेआउट मध्ये केवळ कवटी शाबूत असलेले अर्धवट जळालेले एक शव झुडुपात आढळले. त्यावरून शुभमची ओळख पटली.

विशेष म्हणजे मागील नोव्हेंबर महिन्यात घुग्गुस शहरातच 6 वर्षाच्या वीर नामक मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्नात अटक झालेला गणेश पिंपळशेंडे नामक आरोपीच शुभमचा मारेकरी निघाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आणि मृतक शुभम यांच्यात काय कनेक्शन होते याचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान आहे. प्रकरणाचा अधिक तपास चंद्रपूर पोलीस करत आहेत. जिल्ह्यात गॅंगवॉर, अपहरण, दिवसाढवळ्या होत असलेले खून आणि बिघडत जाणारी कायदा सुव्यवस्था स्थिती यामुळे नागरिक संतप्त आहेत.