🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

"व्हॅलेंटाईन डे"च्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवा.

हिंदू जनजागृती समितीचे पोलीस, प्रशासन, शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर.
Bhairav Diwase.     Feb 13, 2021
चंद्रपूर:-  गेल्या काही दिवसात १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा करण्याची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे. पाश्चिमात्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे.

       व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बिबत्स साजरीकरण करण्याच्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड, हिंसक कृत्य घडल्याच्या अनेक घटना घडत आहेत तसेच या दिवशी मेजवान्या मधून युवक, युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थाचे सेवन आदी अपप्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर या दिवशी संततिप्रतिबंधक साधनांचा विक्रीत होणारी मोठ्या प्रमाणातील वाढ ही अनैतिक संबंधातील वृद्धी दर्शवते, तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. मुलींना खोटी नावे सांगून फसवून त्यांना लव्ह जिहाद चा बळी बनवतात. 
       
थोडक्यात व्हॅलेंटाईन डे मुळे शाळा, महाविद्यालय परिसरातील कायदा-सुव्यवस्था तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा अतिरिक्त ताण पोलिस आणि प्रशासनावर येत आहे. सध्या स्थितीत भारतात प्रति १८ मिनिटाला एक बलात्कार होत आहे? महिलांवरील अत्याचाराची भयावह आकडेवारी सध्याची समाजाची ढासळलेली मानसिकता आणि कायदा-सुव्यवस्थेची दुःखस्थिती दर्शवते. त्यामुळे अशा प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व्हॅलेंटाइनडे च्या नावाखाली होणार्‍या अप प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावी, शाळा महाविद्यालयाच्या परिसरात अपप्रकार करणाऱ्या समाजकंटकांना कह्यात घ्यावेत, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवावी, मुलींची छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, वेगाने आणि मद्यपान करून वाहने चालवनाऱ्यांवर कारवाई करावी.

 तसेच शाळा महाविद्यालयात माता-पित्यांना सौजन्य आणि सन्मान देण्याची भावना वाढीस लागावी यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून १४ फेब्रुवारीला मातृ-पितृ दिन म्हणून शासनाने प्रोत्साहन द्यावे. आणि युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करावा, या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ११ फेब्रुवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तर १२ फेब्रुवारीला अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी  यांना देण्यात आले. निवेदन देताना  हिंदू जनजागृती चे कार्यकर्ते उपस्थित होते.