Top News

चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती सपोंभुर्णा


Bhairav Diwase. Feb 23, 2021
पोंभुर्णा:- चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन. एच. पठाण होते. डॉ. एन. एच. पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले कि, गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रा. डॉ. एन. एच पठाण, प्रा. चौधरी सर, प्रा, उगेमुगे सर, प्रा. घोडेस्वार सर, प्रा. बावनकुळे सर, प्रा. गुडधे सर, प्रा. नरवाळे मॅम तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने