🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

उमरी पोतदार ग्रामपंचायतीवर भाजप चा झेंडा.

सरपंच पदी सौ. थमेस्वरी धनराज लेनगुरे तर उपसरपंच पदी श्री. मंगेश यादव उपरे याची निवड.
Bhairav Diwase. Feb 15, 2021

पोंभुर्णा:- 15 तारखेला उमरी पोतदार ग्रामपंचायत च्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजप या पक्षांनी बाजी मारत सरपंच आणि उपसरपंच पदावर आपले वर्चस्व स्थापन केले. सरपंच पदी सौ. थमेश्वरी धनराज लेनगुरे तर उपसरपंच पदी श्री. मंगेश यादव उपरे याची निवड झाली.

सरपंच पदी सौ. थमेस्वरी लेनगुरे तर उपसरपंच पदी श्री. मंगेश उपरे यांची निवड झाल्याबद्दल माजी अर्थ तथा वन नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, जि. प. सदस्य राहुलभाऊ संतोषवार, पंचायत समिती उपसभापती सौ ज्योतीताई बुरांडे, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, उमरी पोतदार ग्रा.प. माजी उपसरपंच तथा विद्यमान भाजपा नेते श्री. मनोजभाऊ मुलकलवार, भाजपा नेते अजित मंगळगिरीवार आंबेधानोरा येथील विद्यमान उपसरपंच रमेशभाऊ हलमलवार, जामतुकुम येथील माजी सरपंच श्री. रविभाऊ गेडाम, चेक आष्टा ग्रा. प. चे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री.जयंत पिंपळशेंडे श्री.सुभाष पोलपोलवार,श्री.लक्ष्मण गव्हारे श्री. यशवंत ढोंगे,श्री. चंद्रशेखर झगडकर यांनी अभिनंदन केले.