Top News

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार.....

Bhairav Diwase.     Feb 26, 2021
आरमोरी:- आमदार कृष्णा गजबे आपले कामे आटोपून २५ फेब्रुवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान वडसाकडे निघाले होते. त्यांची गाडी आरमाेरी नजीकच्या पेट्रोलपंप जवळ आल्यानंतर त्यांना एक दुचाकीस्वार अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. आ. कृष्णा गजबे यांनी त्यांची गाडी थांबवली. अपघातग्रस्त जखमीला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

      अपघातातील जखमी युवक मुखरु धोडरे असून तो ठाणेगाव येथील रहिवासी आहे. धोडरे यांच्या घरी माहिती होताच जखमीचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचेपर्यंत आ. कृष्णा गजबे तिथे स्वतः थांबून मदत करण्यास सांगितले. आ. कृष्णा गजबे यांनी केलेल्या मदतीबद्दल जखमींच्या नातेवाइकांनी तसेच ठाणेगाववाशीयांनी त्यांचे आभार मानले.यासाठी नंदु नाकतोडे, भाजपाचे पंकज खरवडे, जितेंद्र ठाकरे, राकेश खेडकर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने