Top News

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेवून सदोष मनुष्‍य वधाचा गुन्‍हा नोंदवा:- सौ. अंजली घोटेकर

पुजा चव्‍हाण हिच्‍या मृत्‍युची निःष्‍पक्ष चौकशी करा:- कु. अल्‍का आत्राम
Bhairav Diwase.       Feb 27, 2021
चंद्रपूर:- पुजा चव्‍हाण नामक एका युवतीला आत्‍महत्‍या करून जीवन संपवाने लागले. या चक्‍काजाम आंदोलनाप्रसंगी सौ. अंजली घोटेकर म्‍हणाल्‍या की, ही महाराष्‍ट्रासाठी दुर्देवी व लज्‍जास्‍पद बाब आहे. कारण पुजा चव्‍हाणच्‍या मृत्‍युकरीता ठाकरे सरकारच्‍या मंत्रीमंडळातील वरीष्‍ठ मंत्री संजय राठोड हे कारणीभूत आहे. मिडीयाच्‍या माध्‍यमातुन व सोशल माध्‍यमातुन ज्‍या अकरा क्‍लीप्‍स संभाषणाच्‍या आल्‍या त्‍यातुन स्‍पष्‍ट होते की पूजा चव्‍हाण आत्‍महत्‍या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड व त्‍याचे दोन कार्यकर्ते अरूण राठोड व विलास चव्‍हाण हे कारणीभूत आहेत, परंतु ठाकरे सरकारने अजूनही कोणतीही कार्यवाही किंवा तपास पुजा चव्‍हाण आत्‍महत्‍या प्रकरणात केलेला नसल्‍यामुळे चक्‍काजाम आंदोलनाचा ईशारा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगर चंद्रपूर शाखेनी दिलेला होता.


त्‍यासंदर्भात आज आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ ला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगर व भाजपा महिला मोर्चा ग्रामीण तर्फे मुल रोड चंद्रपूर येथे चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनाद्वारे ठाकरे सरकारला ईशारा देण्‍यात आला की, आपण ताबडतोब वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्‍यावा कारण तपासामध्‍ये मंत्री या नात्‍याने ते ढवळाढवळ करू शकतात आणि पुजा चव्‍हाण आत्‍महत्‍या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच यवतमाळ शासकीय रूग्‍णालयात सुध्‍दा वरिष्‍ठ पोलिसांनी जावून कसून तपास करावा की पुजा अरूण राठोड हीच पुजा चव्‍हाण आहे काय? कारण आमच्‍या माहितीप्रमाणे पुजा अरूण राठोड ही दुसरी कोणीही नसून पुजा चव्‍हाणच आहे व तिचा अतिशय गुप्‍तपणे गर्भपात करण्‍यात आला होता. तसेच हा गर्भपात करण्‍या-या डॉक्‍टरचा सुध्‍दा कसून तपास करावा, कारण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. याप्रसंगी भाजपा उपाध्‍यक्ष महाराष्‍ट्र प्रदेश सौ. वनिता कानडे म्‍हणाल्‍या की, महिलांना अपेक्षा होती की, शिवसेनेचे सरकार म्‍हणजे शिवाजी महाराजांचे सरकार असेल, पण हे सरकार जेव्‍हापासून सत्‍तेत आला तेव्‍हापासून दोन वर्षाच्‍या मुलीपासून 70 वर्षांच्‍या माता-यांवर बलात्‍काराचे प्रमाण वाढलेले आहे, कुठेही सरकारचा अंकुश असल्‍याचे दिसुन येत नाही.


कु. अल्‍का आत्राम म्‍हणाल्‍या की, आपल्‍या मंत्र्याची बाजू न घेता सर्वसामान्‍य जनतेच्‍या भावनांचा विचार करून व पुजा चव्‍हाणला न्‍याय देण्‍याकरिता संजय राठोड यांचा राजीनामा घेवून त्‍यांच्‍यावर व त्‍यांचे दोन साथीदार अरूण राठोड व विलास चव्‍हाण यांच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करावा.

जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले म्‍हणाल्‍या की, पुजा चव्‍हाण हिचा मोबाईल व लॅपटॉप आणि त्‍या अकरा क्‍लीप्‍सचा सायबरच्‍या माध्‍यमातुन सुक्ष्‍म तपास करून कारवाई करावी व संपूर्ण प्रकरणाची निःपक्ष व गंभीरतेने चौकशी करावी, अशी मागणी करण्‍याकरिता आज चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात आले.

हे आंदोलन भाजपा महिला मोर्चा महानगराच्‍या अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर व महिला मोर्चा ग्रामीण अध्‍यक्षा कु. अलका आत्राम यांच्‍या नेतृत्‍वात, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्षा सौ. वनिता कानडे यांच्‍या मार्गदर्शनात घेण्‍यात आले. या चक्‍काजाम आंदोलनाला मुल येथील नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, प्रदेश कार्यकारीणी सदस्‍य रेणुका दुधे, महिला व बालकल्‍याण सभापती रोशनी शेख, चंद्रपूर पंचायत समितीच्‍या सभापती केमा रायपुरे, माजी नगराध्‍यक्ष श्‍वेता वनकर, रजिया कुरैशी, महामंत्री सौ. शिला चव्‍हाण, उपाध्‍यक्षा किरण बुटले, नगरसेविका वंदना तिखे, सचिव सिंधु राजगुरे, महामंत्री सायरा शेख, संजीवनी वाघरे, कल्‍पना पोलोजवार, अर्चना चावरे, कांता ढोके, सुजाता मॅकलवार, अनिता भोयर, वनिता आसुटकर, वैशाली जोशी, आरती आक्‍केवार व असंख्‍य महिला उपस्थित होत्‍या. चक्‍काजाम आंदोलनानंतर माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, महाराष्‍ट्र भाजपा प्रदेशाध्‍यक्षा मा. सौ. उमाताई खापरे, मा. जिल्‍हाधिकारी महोदय, मा. पोलिस अधिक्षक महोदय, मा. ठाणेदार रामनगर यांना मा. उध्‍दवजी ठाकरे मुख्‍यमंत्र्यांना यांना देण्‍याकरिता निवेदन देण्‍यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने